Telegram Group Search
२९ एप्रिल इ.स.१६६१
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचितगड पाठोपाठ शृंगारपुरही स्वराज्यात दाखल करून घेतले.
३० एप्रिल इ.स.१६७४
छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज कंपनीस खणखणीत निरोप एका पत्राद्वारे पाठविला.
१ मे इ.स.१६७५
आदिलशाही हद्दीतील फोंड्याच्या २ दोन माऱ्याच्या जागा मराठ्यांच्या ताब्यात आल्या..!
२ मे इ.स.१६५६
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला.
३ मे इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराजांनी राहुजी सोमनाथ यांना कुडाळ मोहिमेवर पाठविले.
४ मे इ.स.१६७५
युवराज शंभूराजे यांचे निळोजी, शंकराजी, विसाजी व त्र्यंबकजी नीळकंठराव यांनी मिरासपट्टी मागू नये अशा स्वरूपाची ताकीद पत्र दिले.
५ मे इ.स.१६५७
छत्रपती शिवाजी महाराजांची महती पोर्तुगालच्या राजाला पोर्तुगालच्या गव्हर्नरने ऐकवली.
६ मे इ.स.१६५६
रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि रायगड असे नामकरण करण्यात आले.
७ मे इ.स.१६६०
शाहिस्तेखान पुण्यांच्या दिशेने सरकत होता अचानक मराठ्यांनी शाहिस्तेखानाच्या फौजेवर हल्ला चढवला.
८ मे इ.स.१६७५
छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंडे येथे आपला सुभेदार नेमला व दक्षिणेकडील प्रदेशाचा कारभार बघण्यासाठी बाल्ली येथे एक हवालदार नेमला.
2024/05/15 04:35:32
Back to Top
HTML Embed Code: